Ad will apear here
Next
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार यांचा गौरव


पुणे :
‘विजापूरहून केवळ १५ रुपये घेऊन पुण्यात आलो. त्यानंतर अनेक संकटांवर मात करून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेचे कार्य वाढवले. या संस्थेच्या आज ३१ शाळा, महाविद्यालये आहेत. २८ हजार विद्यार्थी संस्थेत शिकत आहेत. या यशामध्ये ईश्वराची कृपा, गरिबांचे आशीर्वाद, पुणेकरांचे प्रेम आणि वडिलांनी दिलेला मूलमंत्र, या चार गोष्टींचा सिंहाचा वाटा आहे,’ अशी भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी व्यक्त केली. अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त डॉ. पी. ए. इनामदार यांचा राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. रत्नाकर गायकवाड, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वनाथ कराड अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. पी. ए. इनामदार यांच्यावरील गौरवांकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. तसेच ‘स्कूल ऑफ आर्ट’चे महेश निरंतरे यांनी रंगवलेले डॉ. पी. ए. इनामदार यांचे तैलचित्र संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले. हा कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आझम कॅम्पस मैदानावर झाला. 

राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. रत्नाकर गायकवाड, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. सुहास परचुरे, राजीव जगताप, डॉ. एस. एन. पठाण, अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष लतीफ मगदूम, डॉ. इनामदार यांच्या पत्नी आबेदा इनामदार, संजय नहार, डॉ. सुधाकर जाधवर आदी मान्यवर व्यासपाठीवर उपस्थित होते. 



डॉ. इनामदार म्हणाले, ‘महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आदींनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. यातून प्रेरणा घेऊन मी शिक्षणसंस्था वाढवली. संस्था अल्पसंख्याकांसाठी असली, तरी येथे जात-पात, धर्म मानला जात नाही. सर्व गरीब आणि गरजूंना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.’ 



ते पुढे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली आहे. यातील तरतुदीनुसार भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. शिवाय, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे देशात अनेक धर्म असले, तरी सर्वांचा ईश्वर एकच आहे.’ 

‘पत्नी, मित्रपरिवार, संस्थेचे पदाधिकारी, संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पुणेकर नागरिक आणि विद्यार्थ्यांनी वेळोवेळी दिलेला पाठिंबा आणि साथ माझ्या यशामध्ये तेवढीच मोलाची आहे. त्यामुळे मी या सर्वांचा सदैव ऋणी राहीन’, असेही ते म्हणाले. 

छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते सन्मान
नियोजित कार्यक्रमानुसार डॉ. इनामदार यांचा सत्कार कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार होता; परंतु शाहू महाराज यांनी या कार्यक्रमापूर्वीच दुपारी आझम कॅम्पसमध्ये येऊन त्यांचा सत्कार केला. त्याची चित्रफीत या कार्यक्रमात दाखविण्यात आली. 

या वेळी बोलताना डॉ. रत्नाकर गायकवाड म्हणाले, ‘इनामदार यांनी सचोटीने केलेले कार्य अद्‌भुत आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनुसार डॉ. इनामदार यांचे मार्गक्रमण सुरू आहे.’



डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘सर्व जाती-धर्मांना पुढे घेऊन जाण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे डॉ. पी. ए. इनामदार यांना मोठे यश मिळाले. भारत विश्वगुरू होण्यासाठी अशा प्रयत्नांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.’

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘मुस्लिम समाजात शिक्षण रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉ. इनामदार यांनी केले. सामाजिक काम करताना येणाऱ्या अडचणींचा त्यांनी अचाट धैर्याने सामना केला. समाजसेवक किती धाडसी आणि अचाट शक्तीचा असला पाहिजे, हे डॉ. पी. ए. इनामदार यांच्याकडे पाहून कळते.’

इक्बाल अन्सारी, डॉ. ऋषी आचार्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात साहिर लुधियानवी यांच्या ‘इन्सान की औलाद है, तू इन्सान बनेगा’ या गीताने झाली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZZDCI
Similar Posts
सुरेश नाईक स्पेस पार्कतर्फे शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्राचा अनुभव देणाऱ्या शिबिरांचे आयोजन पुणे : हिंजवडी येथील सुरेश नाईक स्पेस पार्कतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात दोन दिवसांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्रात रस आहे, त्यांना अंतराळ विज्ञानातील विविध गोष्टींचा अनुभव घेता यावा, यासाठी या संस्थेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते
पुण्यातील चार हजार विद्यार्थ्यांना टॅब आणि उर्दू ॲनिमेटेड सॉफ्टवेअरची भेट पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी. ए. इनामदार आयसीटी अॅकॅडमीतर्फे पुणे शहरातील उर्दू माध्यमातील चार हजार विद्यार्थ्यांना टॅब आणि उर्दू ई-लर्निंग ॲनिमेटेड सॉफ्टवेअरची भेट देण्यात आली. आझम कॅम्पसमध्ये (पुणे कॅम्प) १८ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी उर्दू ई-लर्निंग ॲनिमेटेड सॉफ्टवेअरचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता
आझम कॅम्पसतर्फे पैगंबर जयंतीनिमित्त पुण्यात अभिवादन मिरवणूक पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे (आझम कॅम्पस) १० नोव्हेंबर २०१९ रोजी हजरत महंमद पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) सकाळी साडेआठपासून अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
‘११ वी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ यावर व्याख्यान पुणे : ‘अकरावी विज्ञाननंतरच्या शैक्षणिक संधी’ या विषयावर ‘सीओइपिअन्स’तर्फे विवेक वेलणकर यांचे मोफत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे ते करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करत आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language